LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*ऊस दरवाढीसाठी बेळगावात कन्नड समर्थक आणि शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन*

बेळगाव :
ऊस दरवाढीच्या मागणीने आज बेळगावात पुन्हा एकदा शेतकरी आणि कन्नड समर्थक संघटना रस्त्यावर उतरल्या. सर्किट हाऊसजवळ सुरू झालेलं हे आंदोलन नंतर राणी चन्नम्मा चौकात पोहोचलं. आंदोलकांनी ठिकठिकाणी घोषणाबाजी करत ऊसाला प्रति टन ₹३५०० हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली.

दरम्यान, आंदोलकांनी टायरांना आग लावण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये किरकोळ बाचाबाचीही झाली. वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.

कन्नड कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या वेळी भाष्य करताना सांगितले की, “आज गुरलापूर येथील शेतकऱ्यांचा संघर्ष हा १९८० च्या नरगुंद-नवलगुंद आंदोलनाची आठवण करून देतो. त्यावेळी अनेक शेतकरी शहीद झाले होते. आजही परिस्थिती तशीच आहे. साखर कारखानदारांना प्रति टन ऊसामागे सुमारे ₹१४,००० नफा मिळत असताना शेतकऱ्यांना केवळ ₹३५०० मागण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

चंदरगी यांनी सरकारला आवाहन करत सांगितले की, ऊस दर निर्धारणासाठी स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन करावे आणि व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारी वजनकाटे कारखान्यांवर बसवावेत.

रॅलीदरम्यान तणाव वाढताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस व्हॅनमधून नेण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी नंतर परिस्थिती सामान्य झाली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*