Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कपिलेश्वर मंदिरात श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव उत्साहात संपन्न*

बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगावातील दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मंदिरात सकाळी विशेष रुद्राभिषेक तसेच कालभैरव स्तोत्र पठण करण्यात आले. या विधींचे पूजनकार्य मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे आणि प्रमुख उपस्थित मान्यवर अमित देसाई यांच्या हस्ते पार पडले.

https://youtube.com/shorts/cD_c0GhpWqQ?si=aDimyDa1MY73LC1S

यानंतर विशेष पुष्पार्चना, तसेच महिला सेवेकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने कालभैरव पाळणा पूजन आणि पाळणा गायन करून भक्तीमय वातावरण निर्माण केले.

दिवसअखेर महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी मंदिराचे सर्व ट्रस्टी, सेवेकरी व स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा माहोल निर्माण झाला होता.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*