LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

ज्योती कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव सोहळा

बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विकास महामंडळ, मुंबई आणि शाहू प्रकाशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योती कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मराठी विषयात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण गौरव करण्यात आला.
बेळगाव शहरासह शहरालगतच्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांतील सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेत मराठी विषयात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ पाटील होते. व्यासपीठावर सचिव श्री. विक्रम पाटील, सहसचिव श्री. डॉ. दीपक देसाई, सर सचिव श्री. पी. पी. बेळगांवकर, संचालक श्री. बाळाराम पाटील, श्री. मोहन बी. निर्मळकर, श्री. अनंत एस. देसाई तसेच श्री. सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.news_1779725318_0_249.webp

या सोहळ्यात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या अदिश्री अशोक पाटील, आदर्श राजकुमार पाखरे आणि तनिष्का रमेश कोकीतकर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मानचिन्ह, एक हजार रुपयांची रोख रक्कम आणि पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला शिक्षण मंडळाच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली आवड आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*