LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*जर्मनीतील हॅम्बर्गमध्ये कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा*

जर्मनीतील हॅम्बर्गमध्ये कन्नड राज्योत्सव उत्साहात साजरा

कर्नाटकापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या जर्मनीतील हॅम्बर्ग शहरात यंदाचा कन्नड राज्योत्सव भव्य उत्साहात पार पडला. परदेशात राहणाऱ्या कन्नडिगांच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षांत उभा राहिलेला हा सांस्कृतिक उपक्रम आता जर्मनीतील भारतीय समुदायाचा एक महत्त्वाचा उत्सव बनला आहे.

हॅम्बर्गमध्ये स्थायिक झालेल्या कन्नड भाषिकांनी केवळ सण-उत्सवच नव्हे, तर भाषेचे जतन करण्यासाठी उभारलेल्या “कन्नड शाळेने” देखील या वर्षी लक्ष वेधून घेतले. सुमारे ४० विद्यार्थी या शाळेत नियमितपणे कन्नड भाषा आणि संस्कृतीचे शिक्षण घेत आहेत. परदेशातही मातृभाषेचे बीज जपणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही जर्मनीतच जन्मलेल्या आणि वाढलेल्या कन्नड मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्सव रंगतदार केला.
अरोणा–भार्गव दांपत्याच्या मुलांचे ‘अर्जुन–बभ्रुवाहन’ रूपातील सादरीकरण विशेष आकर्षण ठरले.

हॅम्बर्ग कन्नड मित्र संघटनेचे संस्थापक महालिंगराव वकुंद यांनी सांगितले की,“परदेशातील सामाजिक-भाषिक वातावरण वेगळे असले तरी आपल्या मातृभाषेबद्दलची नाळ कुठेही तुटत नाही. मुलांच्या सहभागामुळे राज्योत्सवाचे सौंदर्य आणखी वाढले आहे.”

उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या हर्ष बिरूर, राघवेंद्र नाईक, हेमंत मेधा, जगदीश शेट्टी, श्रीनिवास मूर्ती, कृष्णकुमार, भार्गव काकलूर, नाझिया शेख आणि हेम वसंत यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.

या स्वयंसेवी शैक्षणिक उपक्रमामुळे परदेशात वाढणाऱ्या मुलांना भाषा, साहित्य, संस्कृतीची थेट ओळख मिळत आहे. दहा वर्षांत या शाळेने अनेक विद्यार्थी तयार केले असून, जर्मनीतील भारतीय समुदायात ती एक ‘माइलस्टोन संस्था’ ठरली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*