Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*दरशन वरूरचा ‘दसऱा सीएम कप 2025’ मध्ये दमदार जलतरण जलवा!*

दरशन वरूरचा ‘दसऱा सीएम कप 2025’ मध्ये दमदार जलतरण जलवा!

म्हैसूर : कर्नाटकातील प्रसिद्ध दसऱा सीएम कप 2025 जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तरुण जलतरणपटू दरशन वरूर याने उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदके जिंकत बेळगावचा मान उंचावला आहे.

२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान चामुंडी विहार अ‍ॅक्वाटिक कॉम्प्लेक्स, म्हैसूर येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत दरशनने एक रौप्य (सिल्व्हर) आणि एक कांस्य (ब्राँझ) पदक पटकावले. त्याच्या या यशामुळे बेळगावातील जलतरण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरशन हा स्विमर्स क्लब बेळगाव आणि अक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा प्रतिनिधी आहे. तो के.एल.ई. सुवर्णा जे.एन.एम.सी. ऑलिंपिक साईझ स्विमिंग पूल, बेळगाव येथे प्रशिक्षक उमेश काळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो. त्याच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक अक्षय शेरगर, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचेही मोलाचे योगदान आहे.

दरशनच्या या यशामागे सततचा प्रयत्न आणि त्याला मिळालेला संस्थात्मक पाठिंबा महत्त्वाचा ठरला. डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, के.एल.ई. सोसायटी), श्री. जयंते हुम्बरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रोटेरियन अविनाश पोटदार, सौ. मॅनेक कापाडिया, सौ. लता कित्तूर, सुधीर कुशाणे, आणि प्रसाद तेंडोलकर यांनी दिलेल्या प्रेरणा आणि सहाय्यामुळे हे यश शक्य झाले आहे.

बेळगावच्या जलतरण क्षेत्रात नव्या पिढीतील दरशनसारख्या खेळाडूंमुळे भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची आशा निर्माण झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*