LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा

देवगिरी गावात दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना मिळणार अधिक चांगल्या सुविधा

बेळगाव | प्रतिनिधी

कडोली ग्रामपंचायत हद्दीतील देवगिरी गावातील शाळेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांच्या इमारतीचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निधीतून साकारण्यात आला आहे.

या नव्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून शाळेच्या पायाभूत सुविधांमध्येही लक्षणीय भर पडणार आहे.

खोल्यांचे उद्घाटन केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कडोली ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सागर पाटील, ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी (PDO) कृष्णाभाई भंडारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, एसडीएमसीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच देवगिरी गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी अशा विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*