LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*पार्किंगमधील दुर्दैवी अपघात : कारच्या धडकेत सिक्युरिटी गार्डचा मृत्यू*

पार्किंगमधील दुर्दैवी अपघात : कारच्या धडकेत सिक्युरिटी गार्डचा मृत्यू

बेळगाव : न्यू गुड्सशेड रोड परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत सिक्युरिटी गार्डचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार बाहेर काढताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत गार्डाची ओळख नागेश शटुप्पा देवजी (वय ५६, रा. माळी गल्ली, बेळगाव) अशी झाली आहे. रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी सुमारे साडेदहा वाजता ही घटना घडली. पार्किंगमधून कार बाहेर काढताना नागेश यांना जोराची धडक बसली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांचा चमू घटनास्थळी पोहोचला व पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी कार चालविणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

नागेश देवजी हे टेगिनकेर गल्लीतील राजगुरु युवक मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे मित्रपरिवार आणि स्थानिक समाजात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*