LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांसह नागरिकांनाही मोठा दिलासा*

बेळगाव शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील शेतीकामांवर परिणाम होत होता. त्यामुळे विशेषतः भात लागवडीसाठी तयारी करणारे आणि पेरणी केलेले शेतकरी चिंतेत होते.

पुरेशा पावसाअभावी काही शेतकऱ्यांना नुकत्याच पेरणी केलेल्या शेतांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी द्यावे लागले होते. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच पिकांच्या वाढीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली होती.

मात्र, गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीला आवश्यक ओलावा मिळण्यास मदत झाली असून पेरणीच्या कामांनाही गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठाही कमी झाला होता. सुरू झालेल्या पावसामुळे जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. आगामी काही दिवसांतही पावसाची साथ कायम राहिल्यास शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*