LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा कार्यकर्ता सुसंवाद मेळावा*

बेळगाव | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटातर्फे सर्किट हाऊस, बेळगाव येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन हा मेळावा विशेषतः आयोजित करण्यात आला असून जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश मोरे यांनी पक्षाच्या विचारधारेवर प्रकाश टाकत सांगितले की,
"शरद पवार साहेबांनी राज्य आणि केंद्रस्तरावर सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी जे शाश्वत धोरणे राबविली, त्याला पर्याय आजपर्यंत कोणत्याही पक्षाने दिलेला नाही. कृषिमंत्री म्हणून त्यांनी 73 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. असा नेता ना आधी झाला, ना पुढे होणार."

ते पुढे म्हणाले की,
"आपल्या पक्षाने कधीही फोडाफोडीची किंवा कार्यकर्ते पळवण्याची राजनीति केली नाही. उलट पक्ष संघटन बळकट करून तळागाळातील लोकांपर्यंत योग्य धोरणे पोहोचवणे हे राष्ट्रवादीचे बाळकडू आहे."

आगामी निवडणुकांसंदर्भात मोरे यांनी आशावाद व्यक्त करताना सांगितले की,
"कर्नाटकासह बेळगाव जिल्ह्यातून अनेक उत्साही आणि सक्षम उमेदवार पक्षात दाखल होत आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीनं उतरून पवार साहेबांच्या विचारांचे पोहोचपावते तळागाळापर्यंत करणार आहे."

या सुसंवाद मेळाव्यास बेळगाव जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजू पाटील, दुर्गेश मैत्री,जिल्हा सचिव महांतेश कोळूचे,राजदील जमादार,प्रतिभा भालेकर,अल्ताफ सनदी,सोहेल कित्तूर
यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. स्थानिक पातळीवर निवडणूकपूर्व संघटन मजबूत करण्याची ही बैठक यशस्वी ठरली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; नियमित सैन्यसेवेची संधीही मिळणार**बेळगावात २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा आरोग्यदायी उपक्रम!*बेळगाव जिल्ह्यात ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर निश्चित; उद्यापासून साखर कारखाने सुरू!*मराठी विद्यानिकेतनमध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन**दिवाळीपूर्वी ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा होणार; आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांना मदत – मुख्यमंत्री फडणवीस**सरदार हायस्कूलमध्ये १६ वर्गखोल्यांची नवी इमारत उभारणार; आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नूतन सभागृहाचे उद्घाटन!**अनुष्का आपटेचा रंगभूमीवर विक्रम! राज्य नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी रौप्यपदक**वकील होण्यापूर्वी सामाजिक जबाबदारी ओळखा! प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे विद्यार्थ्यांना आवाहन**लेक व्ह्यू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा १६वा वर्धापनदिन उत्साहात; १५० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा मानस!**आयडॉल शिक्षक संजय साबळे यांचा मराठी अध्यापक संघाकडून सपत्नीक गौरव!*