Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

होम मिनिस्टर व फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा गौरव

*होम मिनिस्टर व फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा गौरव*

होम मिनिस्टर व फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा गौरव

बेळगाव : एंजल फाउंडेशन आणि केजी क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खासबाग येथील जयशंकर भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर व फॅशन शो कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे आणि फॅशन शोमुळे कार्यक्रमात रंगत निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी एंजल फाउंडेशनच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे महिलांना आपले कौशल्य आणि आत्मविश्वास सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संजय पाटील, मीना बेनके, लीना टोपणनावर, राजेंद्र जैन आणि गिरीश रामदुर्ग यांच्या हस्ते श्री गणेश पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

होम मिनिस्टर स्पर्धेचे निकाल :
1. प्रथम क्रमांक : स्वाती ओमकार कुरणे
2. द्वितीय क्रमांक : पूजा मंजुनाथ मुदगेकर
3. तृतीय क्रमांक : तृप्ती लिंगडे

फॅशन शो स्पर्धेचे निकाल :
1. प्रथम क्रमांक : स्नेहल मावळणकर
2. द्वितीय क्रमांक : सोनिया आळवे
3. तृतीय क्रमांक : पुष्पा जाधव
याशिवाय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना कन्सोलेशन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

news_1781529891_1_512.webp

 


स्पर्धेतील विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना मीना बेनके, लीना टोपणनावर, राजेंद्र जैन आणि दीपक सुतार कुमार जाधव यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
महिलांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*