LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*कर्नाटकात भीषण अपघात: बस–ट्रक धडकेत १७ जणांचा होरपळून मृत्यू,*

कंटेनर ट्रकने आराम बसला धडक दिल्याने अपघातात सतरा जणांचा होरापळून मृत्यू झाला तर पंधरा पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. कंटेनर ट्रॅकने दुभाजकाला धडक दिल्यावर समोरून येणाऱ्या आराम बसला धडकली. त्यामुळे कंटेनर ट्रकची डिझेल टाकी फुटली आणि ठिणग्याउडल्या. यामुळे आराम बसला आग लागली. आगीत सतरा जणांचा होरपळून मृत्यू झाला.

आराम बसचा चालक आणि क्लीनरने बसमधून उडी मारल्याने ते वाचले पण कंटेनर ट्रक चालक आणि क्लीनर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बसमधून एकूण बत्तीस प्रवासी प्रवास करत होते. बस गोकर्णला निघाली होती. बसने पेट घेतल्यावर बसमधील काही प्रवाशांना बस बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती उत्तर विभागाचे आय जी पी डॉ रवीकांतेगौडा यांनी दिली.

जखमीना हिरियूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंटेनर ट्रक चालकाच्या बेजबाबदार पणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अपघातातील मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रु मदत देण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातात मृत झालेल्यांच्या बद्दल शोक व्यक्त केला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*