LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

कुद्रेमनीत 20 लाखांच्या सी.सी. रस्त्याच्या कामाचे पूजन संपन्न

*कुद्रेमनीत 20 लाखांच्या सी.सी. रस्त्याच्या कामाचे पूजन संपन्न*  
                                 _मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या फंडातून 150 मीटर रस्ता मंजूर_

*कुद्रेमनी, ता. बेळगाव:* बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार व महिला आणि बाल विकास, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री *लक्ष्मीताई हेब्बाळकर* यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कुद्रेमनी गावातील नाईकवाडी ते बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील 150 मीटर लांबीचा सी.सी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात करण्यात आला.

आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी *20 लाख रुपये निधी* मंजूर केला असून या *150 मीटर सी.सी. रस्त्याचे* पूजन ग्राम पंचायत अध्यक्ष *विनायक पाटील* व *शंकर पाटील* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी *दिपक पाटील* यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले. 

सदर रस्ता कुद्रेमनी गावातील नाईकवाडी मुख्य रस्ता असून, नागरिकांची अनेक वर्षांची मागणी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी पूर्ण केली आहे. या कामाचे ठेकेदार *बाळकृष्ण पाटील* हे आहेत.

याप्रसंगी *रवी पाटील, अरुण देवण, धोडिंबा पाटील, बाळू कदम, शिवाजी गुरव, जोतिबा बडसकर, भरमाणा लोहार, केदारी गोवेकर, लक्ष्मण धामणेकर, लक्ष्मण कागणकर, रोहण पाटील, परशू नाईक व यल्लाप्पा नाईक* यांच्यासह नाईकवाडी व कुद्रेमानीतील ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी नेहमीच निधी उपलब्ध करून दिला आहे. नाईकवाडीतील हा मुख्य रस्ता झाल्याने शाळकरी मुले, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय होणार आहे,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

नाईकवाडी परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आमदार तथा मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*