LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*2018 अधिवेशनातील शौचालय बांधकामाचे देयक थकले; कंत्राटदार पी. वाय. पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव*

बेळगाव : 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक विधानमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केआयडीबी हॉल परिसरात उभारण्यात आलेल्या 48 तात्पुरत्या शौचालयांच्या बांधकामाचे देयक गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप प्रथम दर्जा सरकारी कंत्राटदार पी. वाय. पाटील यांनी केला आहे. या थकबाकीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

कंग्राळी बी.के. येथील रहिवासी असलेले पाटील यांनी सकाळी आपल्या कामगारांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी थकीत रकमेचा मुद्दा मांडला.

पाटील यांच्या मते, अधिवेशनादरम्यान उभारण्यात आलेल्या शौचालयांसाठी त्यांनी एकूण ₹14,63,403 खर्च केला. यापैकी ₹5 लाख एवढी रक्कम 2018 मध्ये देण्यात आली, मात्र उर्वरित ₹9,63,403 आजतागायत पोलीस आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली नाही. या रकमेबाबत ते अनेक वेळा पाठपुरावा करत असूनही प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.

उधारीवर साहित्य खरेदी करणे, मजुरी देणे यामुळे स्वतःवर आर्थिक भार वाढला असून पुरवठादारांकडूनही आता पैशासाठी तगादा लागल्याचे पाटील यांनी सांगितले. या परिस्थितीत मानसिक ताण वाढल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.

थकीत बिल तातडीने अदा करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. “आपण न्याय देऊन माझी आर्थिक अडचण दूर करावी,” असे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*