Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी*

*२०२१ मोर्चा खटल्याची तारीख २४ मार्च रोजी*

*खटल्यातील कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन*

२५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी कागदपत्रांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा पोलिसी बळावर धर्मवीर संभाजी महाराज चौकात अडविण्यात आला. यावेळी समिती व कार्यकर्त्यांनी चौकातच धरणे धरले तसेच आपल्या मागण्यांवर ठाम राहून घोषणाबाजी केली.

 

या मोर्चावर पोलिसांनी कोरोना काळाचे निमित्त करून नेते व कार्यकर्त्यांवर कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. या खटल्यात संशयित असलेले बरेचसे कार्यकर्ते न्यायालयात वरचेवर गैरहजर राहत आहेत. या खटल्याची पुढील तारीख मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी असून या खटल्यातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन वकील महेश बिर्जे व समिती नेत्यांनी केले आहे.

 

खटला क्रमांक १४५/२०२१ पाचवे अतिरिक्त न्यायालय बेळगाव येथे वरचेवर गैरहजर राहणाऱ्याना माननीय न्यायालयाने अटक वॉरंट काढणार असल्याची सक्त ताकीद दिली आहे. तरी खटल्यातील मनोहर कल्लाप्पा किनेकर, प्रकाश आप्पाजी मरगाळे,शुभम विक्रांत शेळके, प्रकाश रामचंद्र शिरोळकर, किरण गोविंदराव गावडे, रेणू सुहास किल्लेकर, सरिता विराज पाटील, श्रीकांत नाथाजी मांडेकर, रवी महादेव साळुंखे, धनंजय राजाराम पाटील, मदन बाबुराव बामणे ,मालोजी शांताराम अष्टेकर,नेताजी नारायण जाधव, बंडू शंकर केरवाडकर, गजानन पाटील, संदीप सुभाष चौगुले, दिगंबर मारुती कातकर, परेश गोपाळ शिंदे, विनायक यल्लाप्पा सांबरेकर, हनुमंत कृष्णा मजुकर, रामचंद्र शंकर कुद्रेमणीकर,विनायक बाळकृष्ण पावशे, नागेश बळीराम किल्लेकर,उदय नारायण नाईक, अनिल बबन हेगडे, माधुरी अनिल हेगडे, संदीप काशिनाथ मोरे, मल्हारी पावशे,चेतन परिस पाटील, कृष्णा भरमा गुरव, यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*