Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव पोलिसांची धडक कारवाई! १०० पेक्षा जास्त कर्कश सायलेंसर रोडरोलरखाली चिरडून नष्ट*

बेळगाव (प्रतिनिधी):
शहरात वाढत असलेल्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बेळगाव वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान १०० हून अधिक कर्कश आणि बेकायदेशीर सायलेंसर जप्त करून रोडरोलरखाली चिरडून नष्ट करण्यात आले.

एसीपी शिवाजीराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईत शहरातील विविध भागांमध्ये धडक मोहीम राबविण्यात आली. अनेक दुचाकीधारकांनी आपल्या वाहनांवर अत्याधिक आवाज निर्माण करणारे सुधारित सायलेंसर बसवले होते, जे नागरिकांच्या शांततेला आणि पर्यावरणालाही हानीकारक ठरत होते.

जप्त केलेले सर्व सायलेंसर वाहतूक विभागाच्या आवारात जमा करून रोडरोलरच्या सहाय्याने चिरडून पूर्णतः नष्ट करण्यात आले. कारवाईच्या वेळी विभागातील सीपीआय, पीएसआय तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/44HMurZ289M?si=cIQuiqj8BlZOqLqh

पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे सायलेंसर पुन्हा वाहनांवर बसवताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा आणि शहरातील शांततेसाठी प्रशासनाला सहकार्य करा. ध्वनिप्रदूषणविरोधी ही मोहीम आगामी काळातही सुरू राहणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*