Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बालपण परतले लेले ग्राऊंडवर! पारंपरिक खेळांना मोठा प्रतिसाद*

बेळगांव:मोबाईलच्या आक्रमणामुळे विस्मरणात चाललेल्या लहानपणीच्या पारंपरिक खेळांचे आयोजन आमदार अभय पाटील यांनी केले होते. गोट्या, लगोरी, भोगरा, आंधळी कोशिंबीर, टायर पळवणे, विटी दांडू, रिंग पळवणे इत्यादी खेळांचा आनंद कर्नाटक विधानसभेचे सभापती यु. टी. खादर यांच्यासह अनेकांनी घेतला.

बेळगावातील लेले ग्राऊंडवर या लहानपणीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उदघाटन कर्नाटक विधानसभेचे सभापती यु. टी. खादर यांनी केले. सभापती खादर यांनी उदघाटन करून गोट्या खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आमदार अभय पाटील यांच्या समवेत टायर पळवण्याच्या खेळात सहभागी झाले.अनेक आमदारांनी देखील लहानपणाच्या खेळात सहभागी होऊन रम्य ते बालपणच्या आठवणीना उजाळा दिला. उद घाटन झाल्यावर अनेकानी आपल्या मुलांच्या आणि नातवंडाच्या समवेत खेळ खेळून बालपणीच्या स्मृतीना जागवले.

सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत लेले ग्राउंडवर लोकांनी बालपणीच्या खेळांचा आनंद लुटला.मोबाईल आणि सोशल मीडियामुळे पूर्वी खेळले जात असलेले खेळ लोकांच्या विस्मृतीत जात आहेत. लहान मुले आणि तरुण पिढी यांना या खेळांची माहिती व्हावी. हे खेळ खेळून सर्वांगीण विकास व्हावा. एकाच जागी बसून मोबाईल घेऊन बसण्याची सवय बंद पडावी या उद्देशाने लहानपणीच्या खेळांचे आयोजन केल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*