Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या वेदा खानोलकरची चमकदार कामगिरी*

बेळगाव :
दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात दिनांक 12 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजित 69 व्या नॅशनल स्कूल गेम्स जलतरण स्पर्धेत बेळगावच्या कन्येने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू व जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना 4 x 100 मीटर मिडले रिले प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

या यशामुळे बेळगाव शहरासह क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवणे ही मोठी अभिमानाची बाब असून वेदाच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे हे फलित असल्याचे क्रीडा क्षेत्रातून बोलले जात आहे.

वेदा खानोलकर हिला या यशासाठी शाळेचे चेअरमन अ‍ॅड. चंद्रहास अनवेकर, प्राचार्या नविना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक धनाजी सर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा शितल हुलभते, हिंदचे अध्यक्ष अरविंद संगोळी यांचा पाठिंबा लाभला.

तिच्या यशामागे एनआयएस मान्यताप्राप्त जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि कठोर प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. वेदाच्या या यशामुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*