LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा*

मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुणे मुक्ता आलगोंडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन शिक्षक संयोजिका नीला आपटे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यानंतर मुक्ता आलगोंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागातर्फे राष्ट्रगीत , झेंडा गीत, समूहगीत घेण्यात आले. एन्. सी. सी. चे विद्यार्थी व इयत्ता नववीचे विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व तसेच दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाची माहिती, शिस्त व स्वच्छतेचे महत्व मुक्ता आलगोंडी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. बालवाडी विभागातील रुत्विक शहापूरकर , विनित पाटील,पार्थ कांगले,प्रान्वी खणगावकर, मयंक माणगावकर, शिवा संजय पोटे, अन्वित विनायक जाधव,सेजल संदीप कृष्णोजी या विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. हर्ष केदारी गुंजीकर, प्रणव विठोबा पवार, साईराज गुरव, कलाश्री बागेवाडी या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषांत आपले विचार मांडले. यानंतर क्रिडा शिक्षक दत्ता पाटील,महेश हगीदळे, श्रीधर बेन्नाळकर, एन्. सी. सी. मार्गदर्शक वैभवी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक विभागाकडून शारीरिक कसरती घेण्यात आल्या.इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम , डंम्बेल्स,हुप्स सादरीकरण केले. व्यासपीठावर शाळा सुधारणा समितीचे सदस्य सी. ए. विनायक जाधव, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, संयोजिका नीला आपटे, समन्वयक सविता पवार,बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले ,सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत व शाळेचा पंतप्रधान अनिकेत जाधव, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रुपाली हळदणकर यांनी केले

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*