Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात*

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात

बेळगाव/
भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय बालिका दिन आज शनिवारी व्ही. एन्. शिवनगी कन्या विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेर यांनी स्वागत केले.
परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे प्रास्ताविक करताना म्हणाले, राष्ट्रीय बालिका दिवस मुलींच्या हक्कांविषयी, सुरक्षिततेविषयी आणि शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा दिवस आहे, जो समाजात समानता आणण्यासाठी आणि मुलींना सशक्त बनवून उद्याचा प्रगत भारत घडवण्यासाठी प्रेरित करतो.

हा दिवस मुलींचे समाजातील स्थान आणि आत्मविश्‍वास वाढवण्याचा संकल्प करतो.
भाविप राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी बोलताना सांगितले की, आदर्श महिला व्यक्तिमत्त्व म्हणजे संयम, शिक्षण, चारित्र्य आणि कर्तृत्वाचा सुरेख संगम होय. संकटात धीर न सोडणारी, नाती जपणारी, स्वावलंबी आणि कुटुंबाला आनंदी ठेवणारी स्त्री खऱ्या अर्थाने आदर्श ठरते. जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा वारसा, सोबतच शिक्षणाने सक्षम झालेली स्त्री समाजाला दिशा देते, असे सांगितले.

त्यानंतर भारत विकास परिषदेतर्फे विद्यार्थिनींसाठी भारतातील अनन्यसाधारण आदर्श महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. विनायक घोडेकर व डी. वाय. पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्का जुवेकर यांनी केले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*