LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*बेळगावच्या दोन कराटेपटूंची दुबईत होणाऱ्या ‘WKF Youth League’ साठी ऐतिहासिक निवड*

बेळगाव : जिल्हा क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या दोन महिला खेळाडूंची वर्ल्ड कराटे फेडरेशन (WKF) आयोजित अधिकृत ‘Youth League’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 12 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान दुबईतील फुजिरा येथे पार पडणार आहे.

बेळगावच्या क्रीडा इतिहासात प्रथमच दोन मुलींना WKF च्या अधिकृत युथ लीग स्पर्धेत संधी मिळाल्याने जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे.

https://youtu.be/OVwJG7HrZxo?si=mpmPQ-jeTsZdmIVN

👉 अनुष्री बेंबळगी हिची 14 वर्षांखालील गटात कुमिते (+50 किलो) प्रकारासाठी निवड झाली आहे.

👉 संस्कृती काकतकर हिला 17 वर्षांखालील गटात काता प्रकारात संधी मिळाली आहे.

या दोन्ही खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर आणि सचिव जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा हा परिपाक असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बेळगाव जिल्हा कराटे संघटनेचे ध्येय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अधिकृत स्पर्धांसाठी सक्षम खेळाडू घडविण्याचे असून, या निवडीमुळे त्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले गेले आहे.

जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ही निवड प्रेरणादायी ठरत असून, दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*