Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सोने व्यवहाराच्या बहाण्याने बेळगावच्या सराफाची ३५ लाखांची लूट*

बेळगांव:सोने व्यवहाराच्या बहाण्याने बेळगावच्या सराफ व्यावसायिकाला कऱ्हाड येथे बोलावून तब्बल ३५ लाख रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. १३ ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना पोलिस तपासानंतर प्रकाशात आली असून, दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण प्रभाकर आनवेकर (वय ४७, रा. शहापूर, बेळगाव) हे सराफ व्यवसाय करत असून, त्यांची ओळख साईराज या व्यक्तीशी झाली होती. साईराजने आनवेकर यांना कऱ्हाड येथील मुरलीधर उर्फ अनिकेत शेवाळे याची ओळख करून दिली. शेवाळे याने कमी दरात सोने विक्री करण्याचे आमिष दाखवून त्यांना व्यवहारासाठी कऱ्हाड येथे बोलावले.

१३ ऑगस्ट रोजी आनवेकर ३५ लाख रुपयांची रोकड घेऊन कऱ्हाडला आले. संशयितांनी त्यांना मंगळवार पेठेतील एका पडक्या वाड्यात नेले, तेथे त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रोकड असलेली बॅग हिसकावून पसार झाले.

या घटनेनंतर आनवेकर यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत मुरलीधर ऊर्फ अनिकेत शेवाळे (रा. कऱ्हाड) आणि कोल्हापूर येथील एका साथीदाराला अटक केली असून, आणखी एक आरोपी फरार आहे.

पोलिस तपासात प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले आहे की, आरोपींनी आधीपासूनच हा लूटप्रकरणाचा डाव आखला होता. पुढील तपास कऱ्हाड पोलिसांकडून सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*