Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनतर्फे ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनतर्फे ७७व्या प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम फोर्ट रोड येथील असोसिएशन हॉलमध्ये पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करत ऑटोमोबाईल व्यवसायाशी संबंधित विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेत, त्या सोडवण्यासाठी योग्य मार्ग व उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. संघटितपणे पुढे जात व्यवसाय अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहित रविन मोदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमात पुढील पिढीतील व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. अनेक सदस्यांचे सुपुत्र उपस्थित होते. त्यांनी आपल्या आधुनिक कार्यपद्धती, नवीन व्यावसायिक दृष्टिकोन मांडत ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी व्यवसाय ज्या पातळीवर नेऊन ठेवला आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

संस्थेचे सचिव कमरुद्दीन सौदागर, खजिनदार ओमप्रकाश वैष्णव, उपाध्यक्ष रविन मोदी यांच्यासह ऑटोमोबाईल क्षेत्रातील मान्यवर व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये टर्बो ऑटोमोबाईल्सचे वहाब, महाराजा टेम्पोचे सुरेंद्र क्वात्रा, सुरेश ऑटो यांच्यासह अनेक नामांकित डीलर्सचा सहभाग होता.

या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल एस.पी. कार अ‍ॅक्सेसरीजचे समरथ कुडे यांचा विशेष सत्कार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

हा कार्यक्रम व्यावसायिक एकतेचा, राष्ट्रीय मूल्यांचा आणि पुढील पिढीला प्रेरणा देणारा ठरला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*