Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जीवनविद्या मिशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न*

जीवनविद्या मिशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन या संस्थेच्या वतीने नववर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.प्रभाकर कोरे हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने शहापूर कोरे गल्ली येथील गंगापुरी महाराज मठ या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे प्रबोधक शंकर बांदकर,ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर देसाई,शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर,खजिनदार दीपक बिर्जे, सचिव सतीश बेकवाडकर,अंतर्गत हिशोब तपासणीस तानाजी पाटील, अरविंद अष्टेकर,अवधूत सामंत त्याचबरोबर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉक्टर माधव प्रभू, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. विर्गे, हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग जीवनविद्या मिशनचे नामधारक व कोरे गल्ली पंच कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.

जीवनविद्या मिशनच्या वतीने डॉक्टर माधव प्रभू यांची प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या संचालक पदी निवड झाल्याने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर कोरे गल्ली पंच कमिटीच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून देण्यात आला त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.

यावेळी डॉक्टर माधव प्रभू यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदान करण्याबद्दल आवाहन केले. शंकर बांदकर यांनी जीवनविद्या मिशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन जीवनविद्या मिशन दर वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करून अनेकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत असल्याची माहिती दिली.

अध्यक्ष शैलेश शिरोडकर यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*