LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगाव न्यायालयात पत्रकारांवर हल्ला; रौडीशीटरसह चौघांवर गुन्हा दाखल*

बेळगाव : खून खटल्याच्या सुनावणीदरम्यान वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांवर न्यायालय परिसरातच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहबाज पठाण खून प्रकरणात न्यायालय निकाल सुनावणार असल्याने अनेक पत्रकार आणि कॅमेरामन न्यायालय परिसरात जमले होते. दरम्यान, आरोपींना पोलीस न्यायालयातून बाहेर आणत असताना त्यांच्या चित्रीकरणाचे काम सुरू होते. त्याच वेळी रौडीशीटर लक्ष्मण दड्डी आणि त्याच्या साथीदारांनी अचानक पत्रकारांकडे धाव घेत हल्ला चढवला.

या हल्ल्यात पत्रकारांना धमकावण्यात आले तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना तातडीने पोलीस वाहनात बसवले.

घटनेनंतर न्यायालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्याची गंभीर दखल घेत मार्केट पोलीस ठाण्यात रौडीशीटर लक्ष्मण दड्डी, सवीन दड्डी, बसवराज दड्डी आणि बसवण्णी नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*