LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*यल्लोजीराव पाटील यांचा अनोखा उपक्रम!*

यल्लोजीराव पाटील यांचा अनोखा उपक्रम! चार वर्षांपासून दिवाळीला गौरव धन कर्मचाऱ्यांसाठी

कंग्राळी बीके (ता. बेळगाव):

ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा गौरव करण्याची परंपरा गेल्या चार वर्षांपासून माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी कायम ठेवली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ते दरवर्षी स्वतःला मिळणारे ‘गौरव धन’ ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देऊन एक आगळावेगळा संदेश देतात. यावर्षीदेखील त्यांनी ग्रामपंचायतीतील अधिकारी, सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना कपडे व मिठाईचे वाटप करून सणाचा आनंद द्विगुणित केला.

या उपक्रमामुळे संपूर्ण ग्रामपंचायतीत उत्साहाचे वातावरण पसरले असून कर्मचाऱ्यांनी यल्लोजीराव पाटील यांचे आभार मानले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पुजारी, बाबू दोडमणी, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

पाच वर्षे सलग सुरू असलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी आणि मानवी संवेदनांचा उत्कृष्ट आदर्श उभा राहिला आहे. गावाच्या विकासाबरोबरच कर्मचाऱ्यांच्या आनंदाचीही जबाबदारी घेणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*