Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

कुलूप तोडून दागिने लंपास करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

कुलूप तोडून दागिने लंपास करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बेळगाव ग्रामीण परिसरातील शिंदोळी गावात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा मारिहाळ पोलिसांनी यशस्वी छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे 10 मे 2026 रोजी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील बेडरूममधील ट्रेझरीत ठेवलेले सुमारे 42 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून तपास सुरू केला. 25 मे रोजी शिंदोळी गावातील इंडाल नगर परिसरात पोलिस पथक गस्त घालत असताना खांद्यावर बॅग घेऊन संशयास्पद हालचाल करणारा एक युवक पोलिसांच्या नजरेस पडला. चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याने शिंदोळी येथील घरफोडीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वनाथ दुर्गप्पा मुत्तूर (वय 26, रा. बागलकोट जिल्हा) असे असून तो सराईत घरफोड्या असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्यावर मारिहाळ पोलीस ठाण्यातील तीन तसेच काकती पोलीस ठाण्यातील एका घरफोडी प्रकरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 510 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण अंदाजे 23 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि तांत्रिक तसेच फिंगरप्रिंट विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*