LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये स्वच्छता आणि रस्ते प्रश्नांवर प्रशासन सक्रिय*


बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांनी तातडीने प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेत शहरातील मूलभूत समस्यांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले. सोमवारी कॅन्टोन्मेंट सभागृहात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, प्लास्टिकमुक्त मोहीम आणि घनकचरा व्यवस्थापन हे प्रमुख मुद्दे चर्चेत राहिले.

बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मंचलवार हरीविजय यांनी एल अँड टी कंपनीकडून विविध भागांत करण्यात आलेल्या खोदाईनंतर रस्ते अर्धवट अवस्थेत सोडल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

या बाबीची गंभीर दखल घेत ब्रिगेडियर उपाध्ये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश देत सर्व खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय कॅन्टोन्मेंट परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला. असद खान दर्ग्यासह विविध पर्यटनस्थळी “प्लास्टिकमुक्त कॅन्टोन्मेंट” असे फलक उभारण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या कामांची नियमित तपासणी करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, असे ब्रिगेडियर उपाध्ये यांनी सांगितले.

दरम्यान, बेळगाव उत्तरचे आमदार Asif (Raju) Sait यांनी ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांचे स्वागत करत कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*