Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात आंबेडकर जयंतीचा जल्लोष; ‘भीम ज्योत’ 13 एप्रिलला आगमन*

बेळगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना उदयकुमार तळवार DC Administrative, व आंबेडकर जयंतीचे नोडल ऑफिसर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. या वेळी जयंती महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मल्लेश चौगुले, बाबू पुजारी, महेश कोलकर,जीवन कुरणे, संदीप कोलकार, सुब्रमण्यम कांबळे,यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, वरिष्ठ दलित नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील दीक्षाभूमीवरून ‘भीम ज्योत’ आणण्यासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. मल्लेश कुरंगी, रमेश कांबळे, नागेश कांबळे आणि विनायक कोलकर यांच्या नेतृत्वाखाली ही ज्योत बेळगावकडे येत आहे.

ही ‘भीम ज्योत’ 13 एप्रिल रोजी सायंकाळी बेळगावात पोहोचणार असून 14 एप्रिल आंबेडकर जयंतीदिनी अशोक सर्कल येथून आंबेडकर गार्डनपर्यंत तिचे स्वागत मिरवणुकीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर जयंती उत्सवाला अधिकृत सुरुवात होईल आणि पुढे भव्य शुभयात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे शहरात सामाजिक एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*