LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगावात दलित संघर्ष समितीचा(आंबेडकरवाद) संताप*

बेळगावात दलित संघर्ष समितीचा संताप, प्रतीकात्मक अंत्ययात्रेतून कठोर शिक्षेची मागणी!

बेळगाव, :
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर बूटफेक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाविरुद्ध देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दलित संघर्ष समिती (आंबेडकरवाद) बेळगावात आक्रमक झाली आहे. समितीने शहरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत शासनाचे लक्ष वेधले.

राणी चन्नम्मा चौकातून ही अंत्ययात्रा निघाली. यावेळी कार्यकर्त्यांनी राकेश किशोरचा प्रतिकात्मक मृतदेह घेऊन घोषणा दिल्या. घटनास्थळी कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक मृतदेहाचे दहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

https://youtube.com/shorts/2OCP_uDai1E?si=AWYIoa7-XM_4sRyL

दलित संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले, “संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या न्यायमूर्तींवर अशा प्रकारे हल्ला करणे म्हणजे लोकशाहीला गालबोट लावणारा प्रकार आहे. दोषी राकेश किशोरवर कठोरात कठोर कारवाई व्हावी.”

समितीच्या नेत्या शशी साळवे यांनीही आक्रमक भाषण करत सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे प्रत्येक भारतीयाचे संरक्षण करणारे आहे. त्याचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. हा प्रकार केवळ एका व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे.”

दरम्यान, आंदोलनात जिल्हाध्यक्ष महांतेश तळवार, राज्य खजिनदार सिद्धप्पा कांबळे, तसेच दीपक दबाडे, सागर कांबळे, फकीर तळवार, आनंद कोलकर, नागेश कामशेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने दलित बांधव सहभागी झाले होते.
महांतेश तळवार म्हणाले, “देशभरात दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता आम्ही मौन बाळगणार नाही. शासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू.”

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*