Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बिचू गल्ली शिवकालीन कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची उपस्थिती*

बेळगावात होणाऱ्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिचू गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ,आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडविण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम बिचू गल्ली कॉर्नर गाडेमार्ग येथे रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार असून उदघाटक म्हणून बेळगावचे पोलीस आयुक्त श्री.भूषण गुलाबराव बोरसे हे उपस्थित राहणार आहेत.

आज शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी आयुक्तांना मंडळाच्या वतीने कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले, या वेळी संपर्क प्रमुख विकास कलघटगी,सुरज जाधव,निलेश काकतकर,सचिन धाडवे, विशाल सावंत,विनायक पाटील,ओमकार बैलूरकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन रात्री ठीक ८:३० वाजता करण्यात आले आहे.
आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा,असे आवाहन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*