Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती*

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या आणि जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेलगाम,साई स्पोर्ट्स अकॅडमी बेलगाम यांच्या वतीने "पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली"चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये वय वर्ष ३ ते २५ वर्षाच्या ३५० स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.

या स्केटिंग रॅलीची सुरुवात गोवावेस स्विमिंग पूल पासून बेळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर प्रिती विनायक कामकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ माधव प्रभू यांनी स्केटिंग पटूंना पाणी वाचविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

या उद्घघाटन प्रसंगी नगरसेवक नितीन जाधव, विजापूर ग्राहक न्यायालयचे न्यायाधीश कमलकिशोर जोशी,जायंटस ग्रुप ऑफ परिवार बेळगाम चे प्रवीण त्रिवेदी, गंगाधर एम.तानाजी शिंदे, महेश आंबरोळे, राजशेखर रामदुर्ग, प्रशांत सनदि अक्वा डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष सुहास निंबाळकर, विनायक अर्कसाली, महादेव केसरकर,महादेव बडबंजी विवेक मिसाळ, गजानन शिंदे, प्रदीप पाटणकर,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ह्या रॅली मध्ये बेळगांव जिल्हा चे स्केटर्स सौरभ साळोखे, आर्य कदम, दुर्वा पाटील, अमिषा वेर्णेकर, रश्मीता अंबिगा, मनन अंबिगा, दुर्वा पाटील, हिरेन राज, कुलदीप बिर्जे, प्रीतम बागेवाडी, शल्य तरळेकर, आशिष अंगडीकर, सिद्धार्थ पाटील, धृती वेसने, श्रेयस बजंत्री व इतर सर्वजण स्केटर्स उपस्थित होते

पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी आडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा देत स्केटिंग रॅली दोन किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण केली. रॅली पूर्ण झाल्यानंतर या रॅलीचा उद्देश समजावून देऊन या रॅलीमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्केटिंग पट्टूला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ही रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे ,सागर चौगुले या सर्वांचे परिश्रम लाभले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*