LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू*

बेळगाव | प्रतिनिधी

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काँग्रेस सरकारविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू असलेले अनिश्चितकालीन अहोरात्र धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. कथित वाल्मिकी विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच दुष्काळ निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी भाजपने आंदोलन छेडले आहे.

धरणे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील आणि भाजप नेते एम. बी. जिरली यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर टीका करत विविध मागण्या मांडल्या.

वाल्मिकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराला जबाबदार असलेल्या तत्कालीन मंत्री बी. नागेंद्र यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा केली. तसेच दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक मदत आणि नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून, सरकारविरोधात घोषणाबाजी करत मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.

यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, महानगर अध्यक्ष गीता सुतार, बसवराज साणिकोप्प, प्रमोद कोचेरी, धनश्री देसाई, मल्लाप्प मारिहाळ, युवराज जाधव, यल्लेश कोलकार, धनंजय जाधव, संतोष देशनूर, युवराज कदम, चेतन अंगडी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*