Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव : 208 वा भीमाकोरेगाव विजयोत्सव उत्साहात संपन्न*

बेळगाव : 208 वा भीमाकोरेगाव विजयोत्सव उत्साहात संपन्न

बेळगाव शहरात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारा 208 वा भीमाकोरेगाव विजयोत्सव आज भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात पार पडला. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला चालना देण्यात आले.त्यानंतर भीम वंदना देण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या ऐतिहासिक विजयोत्सवात विविध सामाजिक संघटना, दलित चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, प्रगतिशील नागरिक तसेच बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून ख्यातनाम पत्रकार व अभ्यासक डॉ. के. एन. दोडमनी यांनी भीमाकोरेगाव विजयोत्सवाच्या ऐतिहासिक व सामाजिक महत्त्वावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थितांना प्रेरणा दिली.

https://youtube.com/shorts/XdDPPeV8FrI?si=rGtOzA9LWAnnPtTo

यावेळी मल्लेश चौगले, जीवन कुरणे, महादेव तलवार, सुधीर चौगले, मल्लेश कुरंगी,सोसायटी चेअरमन संदीप कोलकर, सुबू कांबळे, महेश कोलकर, समता सैनिक दलचे यल्लाप्पा गडीनाईक, दीपक मैत्री यांच्यासह अनेक दलित नेते, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

भीमाकोरेगाव विजयोत्सवाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि सामाजिक न्यायासाठी लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*