LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*"राज्यस्तरीय जूडो स्पर्धांवर बेळगावचा दबदबा"*

बेळगाव : क्रीडा क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेळगाव क्रीडा वसतीगृहाच्या जूडोपटूंनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवत अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत.

रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी येथे ७ आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या कर्नाटक राज्य जूडो स्पर्धेत तुकाराम लमाणी, वैभव पाटील, नेत्रा पत्रावळे, अंजली पाटील, दर्शन पाटील आणि धनुष्य एल. यांनी सुवर्णपदक पटकावत उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२५ रोजी बेळगाव येथे झालेल्या अंतरमहाविद्यालयीन जूडो स्पर्धेत भुषण वनारसे, सौरभ पाटील, रोहन बी.एस., राधिका डुकरे आणि सायिश्वरी कोडचवाडकर यांनी सुवर्णपदके जिंकत मध्यप्रदेशातील भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत स्थान निश्चित केले.

२५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान बेळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय जूडो स्पर्धेत आसिमा सल्मानी, मेघना मुल्या, कावेरी सूर्यवंशी, आरती मुरकुटे, सहाना बेलगली, वैष्णवी भडांगे, वैभव पाटील, अंजली पाटील, श्लोक कातकर, तेजस आणि श्रेयल कौरी यांनीही सुवर्णपदके मिळवत राजस्थान व मणिपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

तसेच २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी चित्रदुर्ग येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पदविपूर्व जूडो स्पर्धेत संधना, श्वेता अलकनूर, दिव्या पाटील, सोनालिका सी.एस., आफ्रिनबानू, संगमेश मदली, बसलिंगय्या अथनीमठ, धनुष्य एल., आर्यन डोंगळे, चंद्रशेखरगौड आणि प्रथमेश पाटील यांनी सुवर्णपदकांची कमाई करत नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जूडो स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या यशाबद्दल युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक श्री. बी. श्रीनिवास, तसेच जूडो प्रशिक्षिका कु. रोहिणी पाटील आणि श्रीमती कुतुजा मुल्तानी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*