LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*रेक्याविक इंटरनॅशनल गेम्समध्ये बेळगावच्या पॅरा जलतरणपटूंचा दबदबा*

आइसलँडची राजधानी रेक्याविक येथे 23 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या रेक्याविक इंटरनॅशनल गेम्स 2026 या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या पॅरा जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला आहे.

श्रीधर एन. मलगी आणि साहिल आर. जाधव या दोघांनी मिळून तब्बल 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदके पटकावत स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.

स्विमर्स क्लब बेळगाव आणि अक्वेरियस स्विम क्लब बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीधर मलगी यांनी विविध जलतरण प्रकारांमध्ये सात पदके पटकावली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले, तर बटरफ्लाय आणि फ्रीस्टाईल प्रकारात त्यांनी रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.

साहिल जाधव यानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदक, तर 200 मीटर इंडिव्हिज्युअल मेडलेमध्ये कांस्य पदक पटकावले. याशिवाय इतर स्पर्धांमध्ये त्याने चौथा व पाचवा क्रमांक मिळवत दमदार कामगिरी केली.

हे दोन्ही खेळाडू बेळगाव येथील सुवर्णा जेएनएमसी (ऑलिम्पिक आकाराच्या) जलतरण तलावात सकाळ-संध्याकाळ कठोर सराव करत असून, त्यांना उमेश कालघाटगी सर, तसेच प्रशिक्षक अक्षय शिरगर, अजिंक्य मेंढके, नितीश कुदुचकर व गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

या दोन्ही खेळाडूंना पॉलीहायड्रॉन फाउंडेशन, बेळगाव यांचे प्रायोजकत्व लाभले असून, डॉ. प्रभाकर कोरे (KLE सोसायटी), श्री. दिलीप चिटणीस, जयभारत फाउंडेशन, SLK ग्रुप, अलाईड फाउंडर्स, राम मल्ल्या, डॉ. नितीन खोत यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेक्याविक इंटरनॅशनल गेम्स ही पॅरा खेळाडूंसाठी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मानली जाते. या स्पर्धेतील कामगिरीमुळे भारतीय पॅरा जलतरणाला नवी ओळख मिळाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*