Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव पोलिसांचा दणका! मटका अड्ड्यावर छापा, गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई*

बेळगाव : शहरातील अवैध मटका व्यवसाय आणि अमली पदार्थ सेवनाविरोधात बेळगाव पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी केलेल्या स्वतंत्र कारवाईत एका मटका चालकाला पकडण्यात आले असून, तिघांविरोधात गांजा सेवन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत मच्छे परिसरातील केएसआरपी बटालियनजवळ सार्वजनिक ठिकाणी मटका खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित नवीन हणमंत कडककोळ (वय 30, रा. कपिलेश्वर परिसर, बेळगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि मटका खेळाशी संबंधित साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मार्केट पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणावर कारवाई केली. रामलिंगखिंड गल्ली परिसरातील समर्थ भगवान नवले (वय 21) हा सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. वैद्यकीय तपासणीत अमली पदार्थ सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

याशिवाय शाहापूर पोलिसांनी भारतनगर, खासबाग परिसरात कारवाई करत दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला. शंकर मारुती गोळार (वय 26) आणि सदाशिव गौरीश पुजारी (वय 26) यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले.

बेळगाव शहर पोलिसांनी अवैध धंदे आणि अमली पदार्थांविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*