LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगाव श्री गणेश फेस्टिवलला उत्साहात सुरुवात

४५ महिलांचा सहभाग; तिखट पदार्थ विभागात अनिशा मांगले, तर गोड पदार्थ विभागात दीपा घसारी प्रथम

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक आणि सामाजिक उपक्रमांची जोड देणाऱ्या बेळगाव श्री गणेश फेस्टिवलला रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. श्री माता सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून गेल्या २८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या फेस्टिवलचे यंदाचे आयोजन ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी विशेष मिलेट्स अर्थात तृणधान्यांपासून गोड आणि तिखट पदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला बेळगावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता सोसायटीच्या चेअरमन मनोरमा देसाई आणि भक्ती सोसायटीच्या चेअरमन ज्योती अग्रवाल यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. मीना पाटील, प्रतिभा नेगिनहाळ आणि प्राचार्या प्रेमलता पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फेस्टिवलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

ज्योती अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत करत गणेश फेस्टिवलच्या आयोजनामागील उद्देश आणि उपक्रमांची माहिती दिली. प्रतिभा नेगिनहाळ यांनी स्पर्धकांना स्पर्धेचे नियम व निकष समजावून सांगितले. पाककला स्पर्धेचे परीक्षण रुपांजली भोसले आणि प्रतिभा माने यांनी केले.

तृणधान्यांपासून तयार केले विविध पदार्थ

मिलेट्सच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत तब्बल ४५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. राळा, भगर, बाजरी, राजगिरा, नाचणी, चेना, कुठळी, कोदरा, कोराळे आणि ज्वारी यांसारख्या तृणधान्यांपासून स्पर्धकांनी विविध पारंपरिक तसेच आधुनिक पदार्थ तयार करून सादर केले.

तिखट पदार्थांमध्ये वरीचे पदार्थ, धपाटे, राजगिरा भेळ, नूडल्स, सूप, मोमोज, ज्वारीची खिचडी, वडे, बाजरी कबाब, नाचणी चकली, कटलेट, थेपले आणि अप्पे यांचा समावेश होता.

तर गोड पदार्थांच्या विभागात मोतीचूर रबडी, गुलकंद मोदक, बदाम केक, नाचणी केक, बर्फी, करंजी, आंबील आणि विविध प्रकारचे लाडू अशा पदार्थांनी स्पर्धकांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

अनिशा मांगले, दीपा घसारी ठरल्या अव्वल

पाककला स्पर्धेच्या तिखट पदार्थ विभागात अनिशा मांगले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. रश्मी भराठे यांनी द्वितीय, तर रेखा देशपांडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

गोड पदार्थ विभागात दीपा घसारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गीता जुवेकर यांनी द्वितीय, तर रेखा देशपांडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

महिलांच्या पाककौशल्याला व्यासपीठ देण्यासोबतच तृणधान्यांच्या आरोग्यदायी वापराबाबत जनजागृती करण्याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.

उद्या रंगणार रांगोळी स्पर्धा

गणेश फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार, ७ सप्टेंबर रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १८ वर्षांवरील आणि १८ वर्षांखालील अशा दोन गटांत होणार आहे.

स्पर्धकांनी रांगोळीचे साहित्य घरून आणणे आवश्यक असून, स्पर्धेच्या ठिकाणी केवळ रांगोळी काढायची आहे.

पाककला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या पारंपरिक भक्तिमय वातावरणासोबत महिलांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि आरोग्यदायी आहाराच्या संकल्पनेला व्यासपीठ देणारा हा फेस्टिवल यंदाही बेळगावकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*