Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज शुभारंभ,*

बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज शुभारंभ,

बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज शुभारंभ,सलग चार दिवस रंगारंग कार्यक्रम

बेळगाव - श्री माता सोसायटीचे चेअरमन श्री मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून बेळगावात श्री गणेश फेस्टिवल आयोजन केले जात आहे.बेळगावात गेली 24 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचे यावर्षी ही 19 ते 22 ओगष्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.गुडशेड रोड येथील श्री माता सभागृहात सलग चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सोहळयाच्या अंतिम दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा नवरत्न सन्मानाने सत्कार करण्यात येणार आहे.
आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट पासून विनायक बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर या तुफान लोकप्रिय कार्यक्रमाने यावर्षीच्या श्री गणेश फेस्टिवलला सुरुवात होत आहे. दुसऱ्या दिवशी दिनांक 20 ऑगस्ट रोजी महिलांच्या वरीच्या (तांदूळ) गोड आणि तिखट पदार्थांच्या पाककला स्पर्धा होणार आहेत. गणेश फेस्टिवल च्या तिसऱ्या दिवशी दिनांक 21 ऑगस्ट रोजी,अभिजीत कालेकर (खानापूर) प्रस्तुत 'जागर लोक संस्कृतीचा' कार्यक्रम होणार आहे.

दिनांक 22 ऑगस्ट ला नवरत्न सन्मान सोहळ्याने यावर्षीच्या गणेश फेस्टिवलची सांगता होणार आहे.
नवरत्न सन्माना अंतर्गतयावर्षी संतोष दरेकर(समाजसेवक), मीरा तारळेकर (साहित्यरत्न), वैभव लोकूर (नाट्यभूषण),सीमा कुलकर्णी (संगीतरत्न),सतिश लाड (उद्योगरत्न), आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कुस्ती प्रशिक्षक राम पवार (क्रीडा रत्न), अनिता राऊत(श्रमसेवा),आशा रत्न (कृषिरत्न) व सामाजिक संस्थेचा सन्मान दुर्गवीर या गडकोटांचे रक्षण आणि संवर्धन करणाऱ्या संस्थेला ला बहाल करण्यात येणार आहे. बेळगावच्या रसिकांनी आणि गणेश भक्तांनी गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*