LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*बेळगाव वाहनधारकांना दिलासा मिळणार? गोवा CM प्रमोद सावंत यांना निवेदन*

बेळगाव : गोव्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटक वाहनांवर तसेच बेळगावच्या वाहनधारकांवर आकारल्या जाणाऱ्या वाढीव वाहतूक दंडाच्या मुद्द्यावर माजी आमदार अनिल बेनके यांनी गोव्याचे मुख्यमंत्री Pramod Sawant यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

वाहतूक नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे मान्य करतानाच, सध्याच्या दंडात्मक कारवाईमुळे नियमित प्रवासी, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बेनके यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

निवेदनात त्यांनी स्वयंचलित यंत्रणांमधील तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना चुकीची ई-चलने मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अनेक ठिकाणी वेगमर्यादा व पार्किंगबाबत स्पष्ट सूचना फलक नसतानाही दंड आकारला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गोव्यातील पर्यटन उद्योगावरही या कारवाईचा परिणाम होत असल्याचे नमूद करत, भाड्याने घेतलेल्या पर्यटक वाहनांवर होणाऱ्या कठोर दंडात्मक कारवाईमुळे राज्याच्या पर्यटक-अनुकूल प्रतिमेला धक्का बसत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, किरकोळ वाहतूक नियमभंगासाठी आकारल्या जाणाऱ्या मोठ्या दंडामुळे कमी उत्पन्न गटातील नागरिक आणि रोजंदारी कामगारांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दाही बेनके यांनी मांडला.

मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या मागण्यांमध्ये पहिल्यांदाच किरकोळ स्वरूपाचा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना आर्थिक दंडाऐवजी ‘वॉर्निंग नोटीस’ देण्याची व्यवस्था लागू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. विशेषतः पीयूसी, दस्तऐवजातील किरकोळ त्रुटी आणि इतर गंभीर नसलेल्या उल्लंघनांसाठी प्रथम इशारा देऊन जनजागृती करण्यावर भर देण्याचे सुचविण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या विषयाचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे बेनके यांनी सांगितले.

गोवा हे नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी ओळखले जाते. त्यामुळे या विषयावर संवेदनशीलतेने निर्णय घेत नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*