LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव*

बेळगाव : 'मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी' या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहळ्ळी बेळगाव शाळेतील 55 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला.

देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच गरज आहे. याच उद्देशाने शाळेने या दैदिप्यमान अशा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.आधार सोशल ट्रस्ट, धायरी (पुणे) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील अथर्व बेळगुंदकर या नववीतील विद्यार्थ्याचा सोळा हजार शुभेच्छा पत्रातून तृतीय क्रमांक आला.

शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांनी प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामध्ये शाल,प्रशस्तीपत्र , कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश होता. या यशाबद्दल, शिक्षक संचालिका अर्चना गोरले ,मुख्याध्यापिका मनिषा महाजन , व्यवस्थापक सायमा जॉन ,
संयोजक सलमान पठाण , प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षक यांनी अभिनंदन केले. शाळेच्यावतीने हा उपक्रम मुख्याध्यापिका मनिषा महाजन आणि शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यात शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

"आधार सोशल ट्रस्टने फक्त कार्यक्रम नाही केला तर एक संस्कार घडवला आहे."

हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे जवानांसाठी ग्रीटिंग कार्ड्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसंस्कार रुजवणारा, सैनिक व विद्यार्थी,शिक्षक पालक, संस्था यांना जोडणारा सेतू, देशभक्तीची ज्योत पेटवणारा, प्रेरणादायी सोहळाच होता.कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांच्यामुळे ज्ञान, संस्कार आणि साहित्यिक उंची लाभली असे आदरणीय एकनाथ आव्हाड यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते.

या संस्थेचे संस्थापक ज्यांच्या या महान कार्यामागे ध्यास, स्वप्न व सामाजिक बांधिलकीतून हा महान कार्य उभा राहिला असे संतोष चाकणकर प्रेरणास्थान आहेत. बीएसएफचे जवान जे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे असे तसेच ज्यांच्या उपस्थितीने आपल्या मनात देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली . राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धक,समन्वयक या सर्वांना एकत्र ठेवून भव्य कार्यक्रम उभा करण्यात आला. सर्वांनी दिलेली शुभेच्छा कार्ड्स सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*