Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात तृतीयपंथीयांचा मोठा मोर्चा; केंद्राच्या विधेयकाविरोधात संताप*

बेळगांव: केंद्र सरकारच्या ‘लैंगिक अल्पसंख्याक हक्क संरक्षण सुधारणा विधेयक 2026 विरोधात बेळगावात तृतीयपंथीयांनी निषेध करून राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला.

मोर्चात सहभागी झालेल्या तृतीयपंथीयांनी जोरदार घोषणाबाजी केली. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘नाल्सा’ निकालाच्या विरोधात असून स्वतःची ओळख आणि स्वायत्ततेवर गदा आणणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

‘ट्रान्सजेंडर’ या संज्ञेची व्याप्ती मर्यादित करून मोठ्या वर्गाला कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाल्यावर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. वादग्रस्त विधेयक तातडीने मागे घेण्याची आणि तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता येईल असे कायदे लागू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मागण्यांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*