Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात सीसीबीची मोठी कारवाई; गांजा विक्री करणारे दोघे जेरबंद*

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. गावात सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन युवकांना सीसीबी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपींकडून सुमारे एक लाख रुपयांच्या गांजासह मोबाईल फोन असा एकूण 1,00,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे कार्तिक भरत चिखलकर (वय 29, रा. कंग्राळी बी. के.) आणि प्रकाश अर्जुन बगारी (वय 20, रा. मुचंडी) अशी आहेत. हे दोघेही लक्ष्मी गल्ली परिसरात गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या पथकाने धाड टाकली. कारवाईदरम्यान आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1 किलो 920 ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल फोन जप्त केला. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने स्वतंत्र कारवाई करत मटका जुगारावर धाड टाकली. या कारवाईत तिघा जणांना अटक करण्यात आली असून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रियाज घीवाले, सुलेमान अत्तार आणि फईम कोतवाल यांचा समावेश आहे.

तसेच, बागवान गल्ली परिसरात गांजाच्या नशेत असामान्य वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव शहरात अंमली पदार्थ व अवैध जुगाराविरोधात पोलिसांनी कारवाया तीव्र केल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*