LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*निर्यात व्यवसायासाठी बेळगावमध्ये मोठ्या संधी : स्वप्नील शहा*

बेळगाव : निर्यात व्यवसायासाठी बेळगावमध्ये मोठ्या संधी उपलब्ध असून, उद्योजकांनी या संधींचा योग्य लाभ घ्यावा, असे आवाहन बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (BCCI) चे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी केले.

बेळगाव डिस्ट्रिक्ट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (BDSSIA) तर्फे बुधवारी आयोजित आयात व निर्यात व्यवसायावरील जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांमुळे उद्योजकांना व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळते, असे शहा यांनी सांगितले. निर्यात व्यवसायात रस असलेल्या उद्योजकांना चेंबर ऑफ कॉमर्सकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा औद्योगिक केंद्राचे संयुक्त संचालक सत्यनारायण भट म्हणाले की, बेळगावमध्ये 150 हून अधिक निर्यातदार उद्योजकांनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी केवळ 35 उद्योजक सध्या सक्रिय आहेत.

सरकारकडून निर्यात व्यवसायाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले जात आहे. उद्योजकांनी उपलब्ध योजना व सुविधांचा लाभ घ्यावा. बेळगावमध्ये उद्योगांसाठी पोषक वातावरण असून, जिल्हा औद्योगिक केंद्राकडून उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी स्वागत केले. रिटेल ट्रेड अँड फॉरेक्सचे प्रादेशिक उपाध्यक्ष अनुराग अग्रहरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आयात-निर्यात प्रशिक्षण सल्लागार तासीन एम.एम., एचडीएफसी बँकेचे रिटेल ट्रेड फॉरेक्सचे उपाध्यक्ष के. रंगनाथ आणि एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक सिद्राम कुरबेट यांनी मार्गदर्शन केले.

संदीप बागेवाडी, बसवराज रामपुरे, मनोज मत्तिकोप, राजेंद्र मुतगेकर, एम.के. हेगडे, रोहित कपाडिया, विनीत हरकुणी, विजय दरगाशेट्टी, अशोक कोळी, अशोक काटवे, सदाशिव विनीत आदी उपस्थित होते.

वैभव यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे मानद सचिव सतीश नेर्लेकर यांनी आभार मानले.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एचडीएफसी बँक आणि जिल्हा औद्योगिक केंद्र यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*