LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Politics News

*बेळगावला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची भाजपची मागणी; कृषी विभागाला निवेदन*

पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांवर गंभीर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याला तातडीने दुष्काळग्रस्त जिल्हा घोषित करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सरकारकडे केली आहे. यासंदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संयुक्त कृषी संचालक एच. डी. कोळेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनात पावसाअभावी बाधित झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार बियाणे आणि खतांचा पुरवठा व्हावा, निकृष्ट दर्जाचे बियाणे व खतांची विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना शासनाने योग्य हमीभाव निश्चित करून त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. कृषी क्षेत्रातील वाढत्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या शिष्टमंडळात माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगदीश बुदिहाळ यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*