बेळगाव येथील सरदार मैदानावर जय भीम युवक मंडळ (कंग्राळी गल्ली) आणि कर्नाटक दलित संघर्ष समिती (भीम वाद) यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु बसवेश्वर महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष मल्लेश चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. नगरसेवक सिद्राय मेत्री यांनी जगद्गुरु बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. बाबू सुळेभावी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर गजानन सुळगेकर यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले.
या कार्यक्रमास खडेबाजार पोलीस स्थानकाचे एएसआय श्रीकांत जाधव यांच्यासह बाबू सुळेभावी, भावकांना पिरगाने, संतोष चौगुले, विशाल चौगुले, आकाश हलगेकर, संतोष हलगेकर, सुनील पिरगाने, दुर्गेश मल्लाप्पा मेत्री, अनवर द्राक्षी, निखिल मैत्री यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना मल्लेश चौगुले यांनी जगद्गुरु बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा समाजात प्रसार करून ते प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, बेळगावमध्ये डॉ. आंबेडकर जयंती शांततेत पार पडल्याप्रमाणेच बसवेश्वर आणि शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका देखील जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याला सहकार्य करून शांततेत पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनीं ननागरिकांना केले









