Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*नंदगडमध्ये ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी; चन्नराज हट्टीहोळीकडून पाहणी*

नंदगडमध्ये ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी; चन्नराज हट्टीहोळीकडून पाहणी, भोजन व्यवस्थेची जबाबदारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांकडे

नंदगड | प्रतिनिधी

नंदगड येथे सोमवारी होणाऱ्या वीरभूमी लोकार्पण आणि क्रांतिकारक संगोळी रायन्ना यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी प्रशासन व आयोजकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी रविवारी कार्यक्रमस्थळी भेट देत संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सोमवारी दुपारी १२ वाजता वीरभूमीचे लोकार्पण करणार असून, कनक गुरुपीठाचे डॉ. निरंजनानंद पुरी महास्वामी यांच्या पावन सानिध्यात हा सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, उपस्थित सर्व नागरिकांसाठी भोजन व्यवस्थेची विशेष जबाबदारी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वीकारली आहे. चन्नराज  हट्टीहोळी यांनी भोजन व्यवस्थेच्या तयारीचीही प्रत्यक्ष पाहणी करत कोणतीही त्रुटी राहू नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यक्रम शिस्तबद्ध, सुरक्षित आणि यशस्वीपणे पार पडावा यासाठी प्रशासन, स्वयंसेवक व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*