LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*निर्माण-2 पोर्टलवरील अभियंत्यांचे परवाने तातडीने नूतनीकरण करण्याची CREDAI ची मागणी*

बेळगाव: बांधकाम परवानगी अर्जांच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी निर्माण-2 पोर्टलवर परवानाधारक अभियंत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून ते तातडीने सक्रिय करण्याची मागणी CREDAI बेळगावने केली आहे.

या संदर्भात CREDAI बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि सचिव प्रशांत वांडकर यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

सध्या अनेक परवानाधारक अभियंत्यांचे परवाने नूतनीकरण न झाल्यामुळे निर्माण-2 पोर्टलद्वारे बांधकाम परवानगीसाठी अर्ज सादर करणे तसेच त्यांची पुढील प्रक्रिया करणे शक्य होत नाही. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह बांधकाम परवानगीची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः बदल व अतिरिक्त बांधकाम (Alteration and Addition) तसेच ग्राउंड प्लस 4 (G+4) इमारतींच्या बांधकाम परवानगी अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी अभियंत्यांचे परवाने तातडीने नूतनीकरण करून निर्माण-2 पोर्टलवर सक्रिय करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

अभियंत्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण आणि सक्रियीकरण वेळेत झाल्यास बांधकाम परवानगी अर्जांची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहील. अनावश्यक विलंब टाळता येईल आणि नागरिकांना वेळेत आवश्यक परवानग्या मिळण्यास मदत होईल. तसेच परवानाधारक अभियंत्यांनाही त्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडता येतील, असे CREDAI ने म्हटले आहे.

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देऊन निर्माण-2 पोर्टलवरील अभियंत्यांच्या परवाना नूतनीकरण व सक्रियीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी CREDAI बेळगावने केली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*दोन हजारांवरील यूपीआय व्यवहारांवर MDR शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम**खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि कृत्रिम पावसाची मागणी तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी**कंग्राळी बीकेतील कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटवला; अमित सुतार यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम कचरा टाकणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड; सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था**अलतगा क्रॉसजवळ बेकरीला आग; 12 लाखांचे नुकसान, मलगौडा पाटील यांची घटनास्थळी भेट**बेळगाव मिलिटरी स्टेशनमध्ये ‘स्वच्छता आंदोलन’; 750 जणांचा सहभाग, 100 किलो प्लास्टिक कचरा संकलित*नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; 16 सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण.*डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात शास्त्रीनगर कंग्राळी बीकेमध्ये बाप्पाचे जल्लोषात आगमन विविध पारंपरिक वेशभूषेतील कलाकार ठरले आकर्षण; सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक**गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला*