Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई*

सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

बेळगाव :
सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस विभागाने थेट इशारा दिला आहे. "प्रक्षोभक पोस्ट केल्यास थेट फौजदारी खटला दाखल केला जाईल," असा सक्त इशारा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी गुरुवारी दिला.

अलीकडेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद मिरवणुका शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्या. या काळात सर्व धर्मीय नागरिकांनी पोलीस यंत्रणेस सहकार्य केले. मात्र त्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

प्रक्षोभक पोस्ट्स रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. येथे 15 कर्मचारी 24 तास विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त बोरसे म्हणाले की, "प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु कोणालाही भावना भडकवण्याचा किंवा समाजमन दूषित करण्याचा अधिकार नाही. अशा पोस्ट्स आढळताच संबंधितांना त्याच प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडून नोटीस पाठवली जाईल. जर अशा पोस्टमुळे समाजात अशांतता निर्माण झाली, तर संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवला जाईल."

नागरिकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करून आयुक्तांनी स्पष्ट केले की, प्रक्षोभक मजकूर किंवा अभद्र भाषा अजिबात सहन केली जाणार नाही.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*