Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जयंतीपूर्वी स्वच्छता नाही; महानगरपालिकेवर टीका*

बेळगाव शहरातील कसई गल्ली परिसरात ड्रेनेज जोडणीसाठी खोदलेला रस्ता अद्याप पूर्ण करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी धोका वाढला आहे.

याशिवाय, परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कसई गल्लीमध्ये असलेल्या बीफ मार्केट आणि फिश मार्केटमधून निर्माण होणारा कचरा येथेच साचत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच मातंगी देवी मंदिर हेही याच भागात असून जयंतीची सुरुवात याच ठिकाणाहून केली जाते. मात्र सध्याच्या अस्वच्छ आणि धोकादायक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

स्थानिकांनी अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. जयंतीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करून स्वच्छता केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
आंबेडकर जयंतीपूर्वी तातडीने रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*