Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“डी मीडिया गणेशोत्सव स्पर्धा 2024-25 चा निकाल जाहीर"*

बेळगाव :
डी मीडिया आयोजित ‘उत्कृष्ट गणेश मूर्ती आणि देखावा स्पर्धा 2024 व 2025’ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभ सरस्वती वाचनालय, कोरे गल्ली येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे बेळगाव महानगर उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, डिजिटल न्यूज असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर गौंडी आणि प्रवक्ते इकबाल जकाती उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

🎨 2025 मधील उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे विजेते :

🥇 प्रथम पारितोषिक (₹3000) – विनोद विठ्ठल माणसे (चंद्रभागेतून पंढरपूर दाखवतो)
🥈 द्वितीय पारितोषिक (₹2000) – विशाल आप्पाजी कोवाडकर (बिल्डिंग कन्स्ट्रक्शन)
🥉 तृतीय पारितोषिक (₹1000) – राकेश लोहार (छत्रपती संभाजी महाराज भूरानपूर हल्ला)
🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – गुरुराज पाटील (मोबाईल एडिक्शन)
🏅 उत्तेजनार्थ पारितोषिक – रोहन चौगुले (अहमदाबाद विमान दुर्घटना)

या स्पर्धेतील एकूण ₹6000 रोख रक्कम महानगर उपाध्यक्ष महांतेश वक्कुंद यांनी प्रायोजित केली.

🏆 2025 मधील उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती स्पर्धेचे विजेते :🥇 प्रथम पारितोषिक – लक्ष्मण मायांना (हत्ती मूक)
🥈 द्वितीय पारितोषिक – निलांजन तानावडे (वराह अवतार)
🥉 तृतीय पारितोषिक – प्रथमेश मोहनगेकर
🏅 उत्तेजनार्थ – प्रदीप पाटील
🏅 उत्तेजनार्थ – राहुल चोपडे

🌟 2024 मधील उत्कृष्ट देखावा स्पर्धेचे विजेते :

🥇 प्रथम पारितोषिक (₹3000) – राकेश सिद्राय लोहार (कारगिल युद्ध)
🥈 द्वितीय पारितोषिक (₹2000) – श्रीहरी कोचेरी (गुळाचा घना)
🥉 तृतीय पारितोषिक (₹1000) – जितेश नाईक (बेळगावचा गणेशोत्सव)

या बक्षिसांचे प्रायोजकत्व काँग्रेस प्रोफेशनल सेलचे जिल्हाध्यक्ष संदेश राजमाने यांनी केले होते.

🪔 2024 मधील उत्कृष्ट श्री गणेश मूर्ती स्पर्धेचे विजेते :🥇 प्रथम पारितोषिक – कुलजित कोचरी
🥈 द्वितीय पारितोषिक – यश काकतीकर
🥉 तृतीय पारितोषिक – आदित्य ईश्वर मांगले

---

कार्यक्रमात विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
संस्थापक व संपादक दीपक सुतार यांनी आभार प्रदर्शन केले, तर मेघराज हट्टी व माधुरी मिस्त्री यांनी आकर्षक सूत्रसंचालन केले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्पर्धकांच्या कल्पकतेचे, कलात्मकतेचे आणि गणेशोत्सवातील सामाजिक जाणिवेचे कौतुक केले.
डी मीडियाच्या या उपक्रमातून बेळगावातील तरुण कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे सर्वांनी नमूद केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियानगणपत गल्लीतील वनवे नियम कागदावरच? उलट्या दिशेने वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीरवॉर्ड क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; अनिल बेनके यांनी केले मार्गदर्शन*बेळगावकरांसाठी वाहतूक दंडात ५० टक्के सवलत; थकीत ई-चलन निकाली काढण्याची संधी**प्रेमविवाहानंतर बदललेल्या परिस्थितीने घेतला टोकाचा निर्णय? नातेवाईकांची चौकशीची मागणी**मोबाईल देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या; महिलेची रवानगी ७ वर्षे कारागृहात**NEET फेरपरीक्षेपूर्वी Telegram वर बंदी; निर्णयाविरोधात दिल्ली न्यायालयात याचिका**मतदार यादीतील त्रुटींवर अभय पाटील आक्रमक; “एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये”**भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी**“मोदींच्या १२ वर्षांच्या सेवायात्रेचा अभिमान; कार्यकर्त्यांना दिले श्रेय” — एफ.एस. सिद्धनगौडर*